माय माऊली केअर सेंटर ला बिबेवाडी महिला मंडळाचे सदिच्छा भेट

पुणे : माय माऊली केअर सेंटर वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची सेवा करणारी संस्थेला बिबवेवाडी महिला मंडळ पुणे यांनी सदिच्छा भेट दिली.

महिला मंडळाने संस्थेतील आजी-आजोबांना स्वादिष्ट भोजन व क्लिनिंग मटेरियल दिले. त्यावेळी बिबेवाडी महिला मंडळाच्या भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. संस्थेतील आजी-आजोबांबरोबर संवाद साधून संस्थेचे खूप छान काम आहे असे सर्व महिला वर्ग यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले संस्थेच्या वतीने महिला मंडळाला आभार पत्र सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले व संस्थेच्या संचालिका निर्मला मुंदडा यांनी सर्व महिलांचे आभार मानले.

See also  दिव्यांग बांधवांना पेन्शन साठी हयातीचे दाखले वाटप