कामगार हक्कासाठी लढणार :- कामगार नेते सुनील शिंदे

पुणे :- कामगार चळवळीत एकत्र आल्याशिवाय काही मिळत नाही. कामगाराने स्वार्थी पणा सोडून आपण सर्व कामगार म्हणून संघटित होऊन लढल पाहिजे. कामगारांना न्याय मिळवून देणं, हाच माझा नेहमीच उद्देश राहिला आहे. असं परखड मत कामगार नेते सुनील शिंदे यांनी मांडलं.

निमित्त होते के. इ. एम. हॉस्पिटल कामगार संघटनेच्या सल्लागारपदी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांची
एकमताने निवड झाल्याबद्दल. हा पदग्रहण सोहळा व कामगार मेळावा जनसागर हॉल, सोमवार पेठ येथे संपन्न झाला.

ह्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त बोलताना ते पुढे म्हणाले की, संघटना व व्यवस्थापन या मध्ये नेहमी सलोख्याचे नात राहील हा विचार करूनच मी संघटनेच्या सल्लागार पदी राहून काम करत राहील. आपला वाद हा व्यवस्थापनाशी नाही. आपल्या घामाची चोरी जर होत असेल, तर सर्वांनी मतभेद विसरून काम केलं पाहिजे.
यावेळी उपस्थित कामगारांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या व्यथा सांगितल्या.
याप्रसंगी राष्ट्रीय मजदुर संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे व के. ई. एम हॉस्पिटल कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाला कायम व कंत्राटी कामगारांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
सूत्र संचालन राजाभाऊ रेड्डी यांनी केलं. के. ई.एम कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष खांदवे यांनी प्रास्ताविक केले.

See also  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा