सचिन मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दवाखान्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन

औंध : भारतीय जनता पक्षाचे सदस्य सचिन मानवतकर यांच्या वाढदिवसानिमित औंध प्रभागातील नागरिकांसाठी सचिन मानवतकर यांच्या तर्फे मोफत दवाखाना सुरू करण्यात आला .

या मोफत दवाखान्याचे उद्घाटन छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शुभेच्छा देताना आमदार शिरोळे यांनी सांगितले की मानवतकर यांनी औंध येथील कस्तुरबा वसाहत व इंदिरा वसाहत येथे गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू केला आहे.

यावेळी सचिन मानवतकर यांना देतो. या वेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, मा.दत्ताभाऊ खाडे , मा.रवींद्र साळेगावकर , माजी नगरसेवक मा.प्रकाश भाऊ ढोरे , माजी नगरसेवक मा.अमोल बालवडकर, माजी नगरसेवक मा. सनी निम्हण, मा.राहुल कोकाटे, मा.गणेश बगाडे, मा.संजय निम्हण, मा.प्रकाशतात्या बालवडकर, मा.लहू बालवडकर, मा.योगेश जुनवणे, मा.अपर्णाताई कुऱ्हाडे, मा. बाळासाहेब रानवडे, मा. आनंद छाजेड, मा. सचिन वाडेकर, मा.गणेश कलापुरे, मा. शिवम बालवडकर, मा.राजेश नायडू, मा.विनोद धोत्रे, मा.अशोक औताडे, मा.सौ.शारदा पुलावळे, मा.सौ. निशा मानवतकर, मा.सौ. निजामपूरकर ताई, मा.सौ. अनिता कांबळे, मा. सौ.सुभद्रा कुंभार, आदी उपस्थित होते .

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत सचिन मानवतकर यांनी मानवतेची निस्वार्थ सेवा करण्याचे कार्य हाती घेतले आहे ते फारच कौतुकास्पद आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो , सचिन मानवतकर नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी नाविन्य पूर्ण कल्पनेतून काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात, सचिन मानवतकर यांच्या रूपे औंध परिसरात भारतीय जनता पक्षाला एक धडाडीचा कार्यकर्ता लाभला आहे.

यावेळी श्री सचिन मानवतकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

See also  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून हिंजवडी गावातील सुविधांचा आढावा