बाणेर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग स्तरीय पक्ष बैठक संपन्न

बाणेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी प्रभागातील शिवसैनिकांची पक्ष स्तरीय बैठक बाणेर येथे शिवसैनिक डॉ दिलीप मुरकुटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आली.

यावेळी राम कदम कोथरूड संपर्क प्रमुख,नितीन शिंदे उप शहर संघटक,दिलीप जानोरकर शिवदुत, शिवदुत महेश सुतार, विभाग प्रमुख संतोष तोंडे, वैभव दिघे युवा सेना अधिकारी, उप विभागप्रमुख दिनेश नाथ, उप विभाग प्रमुख संदीप सातव, जेष्ठ शिवसैनिक डॉ. दिलीप मुरकुटेशिवसैनिक अमोल फाले, रखमाजी पाडळे, पुरुषोत्तम पाडाळे, गौरव पाडाळे, दयानंद बाबर, संदीप गंगे, सोहेल मुलानी, मनीष भालेराव,संतोष भोसले, पोपट गरड, सलीम सुतार, अनिल लिंगे, स्वप्निल रंध्रे, सैफन मुलांनी आदी उपस्थित होते.


राम कदम, संतोष तोंडे, डॉक्टर दिलीप मुरकुटे, नितीन शिंदे यांनी यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग स्तरीय कोथरूड मतदारसंघातील बैठका यावेळी घेण्यात आल्या यामध्ये विविध राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची बांधणी करण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाणेर पाषाण, सुतारवाडी, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील शिवसैनिक उपस्थित होते.

See also  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे वितरण