कै.बाबुराव बालवडकर शाळेत क्रांती दिन साजरा

बालेवाडी : बालेवाडी गावातील कै. बाबुराव शेटजी गेनुजी बालवडकर मनपा शाळा क्रमांक 121 व 151 मध्ये क्रांती दिन साजरा करण्यात आला.

बालेवाडीतील ज्येष्ठ नागरिक व भारतीय सेनेमध्ये सात वर्ष आपली सेवा केलेले व भारत पाकिस्तान युद्धामध्ये सहभाग असलेले 101 बटालियन चे आपल्या बालेवाडी गावातील गुलाबराव कोंडीबा बालवडकर व राघू नाना बालवडकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी शाळेतील मुलांना माहिती दिली. मुलांनाही त्यांना प्रश्न विचारले व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बाबर मॅडम यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सन्मान केला. या कार्यक्रमास स्वाभिमानीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर, बालेवाडी गावचे माजी पोलीस पाटील आनंदराव कांबळे, उमेश सत्रे, स्वाभिमानी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीप बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुणे शहराचे युवा उपाध्यक्ष संदीप बालवडकर उपस्थित होते.

सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

See also  पीपीएम बालशिक्षण मंदिरात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत