औंध मध्ये मनसेच्या वतीने खड्ड्यांमध्ये झाड लावत आंदोलन

औंध: मनसेच्या वतीने औंध रोड येथील स्पायसर कॉलेज समोरील रोड, व औंध येथील परिहर चौका मध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून प्रशासना विरोधात घोषणा देण्यात आला, व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

या वेळी छत्रपती शिवाजी नगर विधानसभा मतदार संघाचे उपविभाग अध्यक्ष दत्ता रणदिवे,निलेश जूनवणे,शाखा अध्यक्ष मयूर बोलाडे, अमर आढाळगे,जितेंद्र कांबळे,राहुल भोसले उपस्थित होते.

पावसाळ्यानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रशासनाने अद्याप मुजवले नाहीत. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  औंध येथे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप