संभाजी ब्रिगेड शहर पदाधिकाऱ्यासोबत स्वारगेट वाहतुक कर्मचाऱ्याची दादागीरी

पुणे: विश्वजीत चौगुले नामक संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांचे वाहन नो पार्किंग झोनमधून टोईंग करीत असतांना..
सदर वाहतुक कर्मचाऱ्या समक्ष काय दंड असेल तो भरतो वाहन उचलू नकोस..
असे म्हटल्यानंतरही अर्वाच्य भाषा वापरून टोईंग कर्मचाऱ्यांनी हुज्जत घातली.
परिवार सोबत असल्याने विश्वजीतने परिचय देण्याचा प्रयत्न केला.
पण काही सांगण्या अगोदर एका कर्मचाऱ्याने “जा रे मी कुणाला भीत नाही, तु कुठं राहतोस तुला बघतोच”
अशा पद्धतीची रगेलीची भाषा वापरली.
विषय व्यक्तीगत असल्याने जागेवर दंड घेऊन मिटवला तर योग्यच होते,
पण सामंजस्याने बोलत असतांनाही जबरीने वाहन चौकीला नेले ही आरेरावी वाहतुक विभागासाठी अशोभनीय आहे.
विशेष म्हणजे वाहनचालक जागेवर असताना, तो दंड भरण्यास तयार असताना, सोबत परिवार असताना हुज्जत घालून वाहन टो केले जाते. ही दादागीरी एका शिस्तप्रिय संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत योग्य नव्हती, हे अनाकलनीय वाटले. त्यामुळे प्रदेश संघटक अशोक काकडे व काही पदाधिकाऱ्यांनी स्वारगेट वाहतुक विभागाकडे धाव घेतली.


सहायक पोलिस आयुक्त व वाहतुक विभागाचे निरीक्षक यांना सदर प्रकरण लक्षात आणून दिले. हुज्जत करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी जाहिर माफी मागण्यास भाग पाडले. त्याने माफीही मागीतली.यापुढे आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला बेकायदेशीरपणे छेडल्यास गाठ संघटनेशी राहील हे अवगत करून दिले. यावेळी ॲड. सचिन झाल्टे पाटील, संभाजी ब्रिगेड हवेली तालुकाध्यक्ष प्रशांत नरवडे, वैभव शिंदे, संजय गवळी व कार्यकर्ते उपस्थित होते.नियम काय सांगतो…
नो पार्किंग झोनमधून जेव्हा पोलीस वाहन टोइंग करतात तेव्हा त्यांना काही प्रोसिजर फॅालो करावी लागते.
जेव्हा असे वाहन दिसते तेव्हा पोलिसांनी त्याचा क्रमांक, रंग, वाहनाचा प्रकार इत्यादी तपशील लाऊड स्पीकरवर जाहीर करावा लागतो.
उदघोषणेला प्रतिसाद न मिळाल्यास पोलिसांनी वाहनाचे फोटो काढावे.
फोटो काढल्यानंतर पोलीस पंचनामा करतील. त्यांनी टो केलेले वाहन कोठे जमा केले आहे, याचा तपशील देखील तेथे लिहावा लागतो.
पण नियम न पाळता घाई घाईत वाहने उचलून दहशत निर्माण केली जाते व दंड वसूल केला जातो ही शुद्ध आरेरावी आहे.

See also  कात्रज कोंढवा रस्त्यावर त्रस्त नागरिकांनी लावले महानगरपालिकेच्या निषेधाचे बॅनर