चांदणी चौक (एनडीए चौक) प्रकल्पातील रस्त्यांचे अर्धवट कामे असताना उद्घाटनाची घाई का करण्यात आली? – कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवेदन

कोथरूड : चांदणी चौक (एनडीए चौक) प्रकल्पातील रस्त्यांचे अर्धवट कामे असताना उद्घाटनाची घाई का करण्यात आली? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे सर्व सेल अध्यक्ष यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपमहाप्रबंधक व परियोजना निदेशक (तांत्रिक) एस.एस. कदम सर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चांदणी चौक प्रकल्पातील अर्धवट रस्त्यांच्या कामांबाबत तसेच नव्याने काही महत्त्वाचे अत्यावश्यक विकासकामे या ठिकाणी करण्याबाबत प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देण्यात आले.

यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या युवती अध्यक्षा ऋतुजा देशमुख उपस्थित होते.

चांदणी चौकामध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिल्यानंतर निदर्शनास आलेल्या गोष्टी खालील निवेदनामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आल्या आहेत.

१)पुणे शहराचे मुख्य प्रवेशव्दार समजले जाणारे राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील (नवे नामकरण एनडीए चौक) अनेक रस्त्यांचे जवळ पास १७ किलोमीटर रस्ते विकसित करण्याच्या – प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडले.

संपूर्ण चौक हा भुलभुलैया झाला असून अनेक वर्षापासुन चांदणी चौक कोथरूड परिसरात – राहणारे नागरिक सुध्दा दिशादर्शक फलक स्पष्ट नसल्याने रस्ता चुकत आहे. आपण लावलेले छोटे फ्लेक्स व चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमा-अवस्था असुन योग्य दिशादर्शक फलक हे चौक व रस्ते सुरु होण्यापुर्वी काही अंतरावर लावावे जेणे करुन वाहनचालकांना याबाबत स्पष्ट कळेल.

२) वेद भवन समोर सुरु असलेले नवीन भुयारी मार्गाच्या कामामुळे कामामुळे मुंबईकडे व साताराकडे जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचा होणारा त्रास कमी करण्याकरिता कायमस्वरूपी वाहतुक वार्डनची नेमणुक करावी.



३) राष्ट्रीय महामार्गालगत विकसित केलेल्या एकाही रस्त्यालगत (१७ रस्ते) नागरिकांकरिता एकही फुटपाथ अथवा पादचारी व्यवस्था करण्यात आलेली नाही. “म्हणजे आपण पादचारी नागरिकांचा विचार सुध्दा केलेला दिसत नाही. तरी या बाबत राष्ट्रीय नवा महामार्ग वगळता खालील व बाजुच्या सेवारस्त्यावर नव्याने त्वरित फुटपाथ, पादचारी व्यवस्था उभारुन नागरिकांची गैरसोय दुर करावी ही विनंती.

४) राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर, चांदणी चौका मध्ये पडलेले खड्डे, आजुबाजुचे मोठ-मोठे राडारोडाचे ढीग उचलुन संपुर्ण चौकातील रस्त्यांवरील अर्धवट कामे पुर्ण करावीत.

५) मुळशीकडुन सातारा कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पुन्हा आपण नव्याने आरसीसी पडदी व रस्त्याचे काम चालु केल्याचे निदर्शनास दिसते आहे. या ठिकाणी मुळशीकडुन सातारा कडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उतरण्याकरिता केलेल्या पुलावरील तीव्र उतार असल्यामुळे वाहनांची वेग मर्यादा जास्त असल्याचे पाहण्यास मिळाले त्यामुळे भविष्यात अपघात होण्याचे प्रकार होऊ शकतात यावर योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

See also  छ.संभाजी उद्यान येथे 'चला बोलूया' फलकाचे उद्घाटन



६) राष्ट्रीय महामार्गावर म्हणजेच बरोबर चांदणी चौक पुलाखाली अनेक नागरिक कोल्हापुर-सातारा कडे जाण्याकरिता वाहनांची प्रतिक्षा करत थांबलेले दिसतात. तसेच या ठिकाणी रिक्षांचा थांबा सुध्दा अनधिकृत पणे उभा असल्याचे दिसते. हे अतिशय धोकादायक असुन सदर स्पॉट संपुर्ण पणे मानव विरहित असणे आवश्यक आहे. भविष्यात अनुचित प्रकार घडु नये या करिता येथे कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात.

७) सेवारस्त्यालगत खोदलेल्या डोंगराचे कठडे हे धोकादायक असून बऱ्याच ठिकाणी या कठड्यांवर कॉक्रीट अथवा जाळीत बसविल्याने हे लुज झालेले दगड कधीही पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या डोंगर कठडयाला लागुन सेवारस्ता असल्याने वाहनांवर व नागरिकांवर पडण्याची भिती निर्माण झाली आहे.

८) सर्वात म्हत्वाचे म्हणजे आपण या संपूर्ण प्रकल्पाच्या विविध ठिकाणी केलेली रंगरंगोटी व सुशोभिकरणाचा दर्जा इतका खराब आहे की महिन्या पूर्वी केलेली ही सर्व कामे काही वर्षापुर्वीची असलेली वाटत आहेत. हा संपूर्ण चांदणी चौक प्रकल्प पुणे शहराचे मुख्य प्रवेशव्दार असल्याने या ठिकाणी पडलेली राडारोडाचे ढीग, अर्धवट कामे, वाहतुक कोंडी, सुशोभिकरणाचे रंगरंगोटीचे दर्जाहीन काम, नागरिकांसाठी चालण्याकरिता न केलेली फुटपाथची कामे, दिशादर्शक फलकांची व्यवस्था नसल्याने हा संपुर्ण प्रकल्पाचा नागरिकांना उपयोग नाही तर मनस्ताप होत असल्याचे निदर्शनास येत आहे.आदी मुद्दे निवेदनामध्ये उपस्थित करण्यात आले आहेत

कामे अपूर्ण असताना उद्घाटन का करण्यात आले याबाबत प्रशासनाने कोथरूडकर यांना तसेच पुणेकरांना खुलासा करावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे उपप्रबंधक कदम यांच्याकडे केली.