अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे ‘मधुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन
‘मधुमेह आणि समाज शिक्षण’ याविषयी शनिवारी डॉ. रवींद्र नांदेडकर यांचे मोफत मार्गदर्शन

पुणे:- राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र नांदेडकर यांनी स्थापन केलेल्या अनुयश आरोग्य प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ‘मधुसंवाद’ या विशेष कार्यक्रमाचे मोफत आयोजन करण्यात येते. या अंतर्गत दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा करण्यात आलेल्या शिक्षक दिनानिमित्त ‘मधुमेह आणि समाज शिक्षण’ याविषयी डॉ. रवींद्र नांदेडकर मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक मुरकुटे भूषविणार आहेत, अशी माहिती अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी कळविली आहे.


हा कार्यक्रम शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० (पाच) वाजता, दुसरा मजला, पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी उपस्थित श्रोत्यांना डॉ. रवींद्र नांदेडकर यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळणार असून यावेळी उपस्थित सर्वांची मोफत रक्त शर्करा तपासणी देखील करण्यात येणार आहे. या मोफत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या सचिव रूपाली नांदेडकर आणि विश्वस्त विलास नेवपूरकर यांनी केले आहे.

See also  जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील