मांजरी येथे दिव्यांग बांधवाला घर बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करत उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा

मांजरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त जनाधार दिव्यांग संस्था यांच्या विनंती वरून मांजरी गाव माळवाडी येथील दिव्यांग बांधव आण्णा देवराम जाधव यांचे पावसामुळे झालेले अतिशय दयनीय अवस्थेतील घर उपसरपंच सुमित आप्पा घुले यांनी स्वखर्चाने बांधून देणार असून त्याचा शुभारंभ माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच शिवराज आप्पा घुले, माजी सरपंच आण्णा धारवाडकर,बाळासाहेब आण्णा घुले, विशाल म्हस्के,समीर घुले, संजय धरवाडकर,सचिन घावटे,सत्यवान घुले,गणेश गायकवाड,आशिष शिवाजी घुले, विध्याधर भोसले,अमित टिळेकर,नवल कुजीर,अतुल घुले,सागर प्रभुणे, कैलास प्रभुणे, प्रशांत घावटे,गणेश घुले, अक्षय वाडेकर, सोहेल मणेर, दत्तात्रय ननावरे आणि सर्व दीव्यांग बांधव उपस्थित होते.

See also  आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न