बालेवाडी येथील अष्टविनायक मित्र मंडळाने सहकारी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती

बालेवाडी : श्री अष्टविनायक मित्र मंडळ बालेवाडी यांचे रोप्यमहोत्सवी (२५ वे) वर्ष असून मंडळानी ह्यावर्षी श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे .

माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते श्रींची विधिवत पुजा व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच मंडळ दर वर्षी सामाजप्रभोदन व्याख्यान व आरोग्यविषयक उपक्रम राबवत असतात.तीच परंपरा कायम राखत मंडळाने बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी मोफत नेत्रतपासनी व रविवार दिनांक 24 सप्टेबंर 2023 रोजी श्री विदर्भ रत्न रामणाचार्य ह.भ.प.रामरावजी ढोक महाराज यांचे कीर्तन ठेवलेले आहे.

यंदाच्या वर्षी मंडळाने हिमालयातील केदारनाथ मंदिराची उभेहोक प्रतिकृती सहकार्य असून यामध्ये आकर्षक सजावट करत गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून या देखाव्याचा आनंद गणेश भक्तांना घेता येणार आहे.

See also  येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांसाठी ‘तणावमुक्ती’ बाबत व्याख्यानाचे आयोजन