बोपोडी : बोपोडी मध्ये गणेश मूर्तींचे वितर माजी नगरसेवक, गणेश भक्त आनंद छाजेड यांचा औंध – बोपोडी भागातील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम २१रू. मध्ये ४८२ गणेश मूर्तींचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम छाजेड पेट्रोल पंप बोपोडी येथे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे व कार्यक्षम माजी नगरसेवक प्रकाश भाऊ ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले, आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या हस्ते श्री. गणेशाची आरती करून गणेश मूर्तींचे वितरण करण्यात आले व त्यांनी नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सपना छाजेड, ॲड. कोमल साळुंखे, नेहा गोरे, शाम काची, सदाशिवजी वाघमारे, देवेंद्र बिडलान, राजु पिल्ले, संकेत कांबळे, अक्षय चव्हाण, सौरभ चव्हाण, संतोष जगदणे, संगिता कांबळे, हर्षला भोसले, अवंतिका भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे यांनी केले.