केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन


मुंबई, दि. २३: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री.शाह यांचे श्रीकृष्णमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.

See also  'कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी' या उपक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन