पुणे, दि. १५: केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व जिमखाना सचिवालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धांचे २०२३-२४ चे १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते १८ फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळाचे सचिव सुजीतकुमार मिश्रा यांच्यासह सचिवालय जिमखान्याचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप २२ फेब्रुवारी राजी सायं. ४ वा. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सचिवालय जिमखान्याचे मानद सह सचिव तथा स्पर्धा सचिव सुनिल आगरकर यांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी देशभरातील विविध राज्यातून ४५ संघ उपस्थित राहणार असून स्पर्धेकरिता पंच व अन्य तांत्रिक सहकार्य महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेकडून लाभणार आहे, असेही श्री. आगरकर म्हणाले.
घर Uncategorized अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल स्पर्धेचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजन