पत्रकारांना कणा नाही असे समजणारे लोकं सध्या सत्तेत आहेत -जितेंद्र आव्हाड

मुंबई : पत्रकारांना कणा नाही असे समजणारे लोकं सध्या सत्तेत आहेत. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारांनी नेहरुंना सोडलं नाही पण त्यांनी कधी सत्तेचा दांडूका वापरला नाही. तुमच्या धाब्यावर जेवून दुसऱ्या दिवशी बातम्या बदलणारे पत्रकार महाराष्ट्रातल्या मातीत जन्माला आलेले नाहीत. बावनकुळे यांनी पत्रकार धर्माचा अपमान केला आहे. त्यांनी पत्रकारांची माफी मागितली पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांची पत्रकार परिषद खोटी, जनतेची दिशाभूल करणारी आणि राष्ट्रीय वातावरणात गोंधळ घालणारी व निवडणूक आयोगाला खोटी दिशा दाखवणारी होती. ८ मार्च २०२३ रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे की नागालँडचे मुख्यमंत्री व एनडीपीचे अध्यक्ष रिओ स्वतः एक वेगळ्या पक्षाचे आहेत व रिओ आणि बीजेपी हे एकमेकांविरुद्ध लढले होते. नंतर बीजेपीने त्यांना समर्थन दिलं त्यानंतर राष्ट्रवादीनेही समर्थन दिलं त्यात काही राजकीय भूमिका होत्या. NDA ला समर्थन देत आहोत असं त्यात कुठेही म्हटलेलं नाही. जे काही प्रफुल्ल पटेल यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं ते संपूर्णत: खोटं होतं.

दुसरं म्हणजे पी ए सन्माचं जजमेंट हे २००३ साली आलं होतं. ते लेजेसलेटीव्ह पार्टीच्या ताकदीवरती आलं होतं. २०२३ साली शिवसेनेचं जजमेंट आलं. त्यात त्यांनी सांगितलं की शिवसेनेचे जे काही केसेस चालू आहेत त्यात आमचा काही संबंध नाही असं नाही आहे. दोघाही पक्षांची जी काही वैधानिक बाजू आहे जी काही कायदेशीर बाजू आहे ती तशीच आहे. पी ए सन्माच्या वीस वर्षांनंतर शिवसेनेच्या आलेल्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा एकाच पक्षाला विचारात घेऊन घेतलेला आहे त्यांनी वेगवेगळ्या टेस्ट घ्यायला हव्या होत्या. सगळ्या जजमेंट या फक्त लेजेसलेटीव्ह मेजोरेटीवर येतात हे अत्यंत चुकीचं असल्याचंदेखील त्यात नमूद आहे. ज्या सदस्यांच्या सदस्यतेवरच प्रश्नचिन्ह आहे त्यांची मोजणी पक्षाचं माप मोजण्यासाठी केले जाऊ शकत नाही असंदेखील त्यात लिहिलं आहे.

पक्षाने ज्याला उमेदवारी दिली, ज्याने नेमणूक केली आहे त्याने पक्षाच्या एबी फॉर्मवर सही केली. शरद पवार साहेब त्यांच्या प्रचाराला आले. महाराष्ट्र राज्याला आम्ही एक स्वप्न दाखवलं त्याची पूर्तता करू असं सांगितलं. हे सांगितल्यानंतर लोकांनी घड्याळाचं बटण दाबून आम्हाला मतदान केलं. म्हणजे पक्षाचं आणि निवडून आलेल्या उमेदवाराचं व पडलेल्याही उमेदवाराचं संबंध काय आहे. तर पक्षाने दिलेले शब्द हे लोकांनी ऐकले आणि त्यांनी उमेदवारांना मत देऊन आमदार केलं. प्रत्येक आई जेव्हा मुलाला जन्म देते तेव्हा एक नाळ असते. तशीच पक्षाची आणि आमदारांची एक नाळ असते. ती अशीच सहजतेने कुणी तोडू शकत नाही. जो राजकीय पक्ष आहे त्यालाच व्हीप बजावण्याचं अधिकार आहे व त्यालाच नेतृत्व कुणी करावं हेदेखील सांगण्याचा अधिकार आहे. कुणीही महाराष्ट्राची दिशाभूल करू शकत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की राष्ट्रवादी पक्षाचे निर्माते हे शरद पवार आहेत.

See also  संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार- शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे