महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुतारवाडीत विसर्जन रांगेतील गणेश मंडळांचे स्वागत

सुतारवाडी : सुतारवाडी गावामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आलेल्या सर्व गणेश मंडळांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.

यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण ,विभाग अध्यक्ष पांडुरंग सुतार, मयूर सुतार हे उपस्थित होते. यावेळी सर्व मंडळांना श्रीफळ,भगवी शाल, भगवी टोपी व तुळशीचे रोप देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाध्यक्ष मयूर भगवान सुतार, उपशाखा अध्यक्ष विजय ढाकणे, महिंद्रा रणपिसे, तानाजी गाडेकर, दशरथ खेडेकर, रणजीत गिलबिले, नीलचंद्र माने, दीनानाथ चव्हाण, नवनाथ काटे यांच्या यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सुतारवाडी मधील सर्व गणेश मंडळांना यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वागत करून सन्मानित करण्यात आले.

See also  लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा