आपच्या पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्षपदी उच्चशिक्षित तरूण रविराज काळे यांची निवड

पिंपरी चिंचवड: आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्षपदी रविराज काळे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया यांनी रविराज काळे यांची युवक शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि महाराष्ट्र सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी विश्वास दाखवून निवड केली आहे. उच्चशिक्षित तरुण रविराज काळे पहिल्यापासून सामाजिक कामात अग्रेसर होते. त्यांचे शिक्षण एम काॅम झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेली आंदोलनात आपले कौशल्य दाखवले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील आम आदमी पार्टी युवक तसेच महिला यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करून पक्ष बांधणी करत आहेत. पिंपरी चिंचवड शहराच्या रयत विद्यार्थी परिषदेचे काम पाहत होते.

आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने उच्चशिक्षित युवा नेतृत्वाच्या हातात युवक अध्यक्षपदाची सूत्र सोपवली असून युवकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचा प्रयत्न पक्षाच्या वतीने केला जाणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्न आक्रमक पद्धतीने मांडण्यासाठी युवकांची नवी फळी या निमित्ताने राजकारणात पाहायला मिळेल असे रविराज काळे यांनी सांगितले आहे.

See also  मंदिरे ब्राह्मण मुक्त करण्याची वेळ आल्याचा इशारा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषाेत्तम खेडेकर