पाषाण सुतारवाडी येथे शिवसेनेच्या वतीने होऊ द्या चर्चा”करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड” कार्यक्रमाचे आयोजन

पाषाण : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ दया चर्चा “करुया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड” या आंदोलनाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदिर सुतारवाडी व साई चौक सुस रोड पाषाण येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ विभागप्रमुख श्री.सतोषभाऊ तोंडे यांनी व शाखा संघटिका स्वातीताई रणपिसे शिवदूत महेश सुतार यांनी केले.


यावेळी केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देऊन 09 वर्ष वाढवलेली महागाई व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले हे पथनाट्य सादर करून जनतेला दाखवून दिले तसेच रामभाऊ कदम कोथरुड विधानसभा संपर्क प्रमूख यांनी शासनाच्या फसव्या योजनाचा भांडाफोड केला तर संतोष तोंडे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांचा पर्दाफाश केला.
त्या प्रसंगी उपविभाग प्रमुख दिनेश नाथ, संदीप सातव, शाखाप्रमुख अजिंक्य सुतार, प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, उपसंघटिका सुनीताताई रानवडे, सुरेखा शेळके, शालिनीताई पाडळे, प्रभाग समन्वयक अमोल फाले शिवसैनिक व सुतारवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथील लक्ष्मी माता मित्र मंडळाने साकारला 'जसवंत थाडा' मंदिर देखावा