शासनाचा कंत्राटी भरतीचा जी आर रद्द; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून पिंपरी चिंचवड मध्ये आनंदोत्सव

पिंपरी : राज्य सरकारने मागील महिन्यापासून शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरतीने पद्धतीने भरती सुरू केली होती. यासाठी वेगवेगळ्या नऊ कंपन्यांना काम देण्यात आले होते. यातील काही कंपन्या या सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या व मंत्र्यांच्या असल्याचा आरोप देखील झाला होता. त्याचबरोबर राज्यभरातून कंत्राटी भरतीच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी व तरुणांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने निषेध मोर्चे सुरू होते सुरू होते.

आज याची दखल घेत राज्य शासनाने कंत्राटी भरती चा जी आर रद्द केला. या निर्णयाचा पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येत आनंदोत्सव साजरा केला.

*यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की* भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने आणलेला कंत्राटी भरती चा जी आर हा अन्यायकारक होता. याच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बरोबरच इतर विद्यार्थी संघटना देखील आक्रमकपणे या जीआरच्या विरोधात आंदोलन करीत होत्या. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सामूहिक शक्तीपुढे आज भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांना झुकावे लागले. राज्यातील तमाम विद्यार्थी व विद्यार्थी संघटना यांचा हा विजय आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र शासनाच्या शासकीय शाळांचे खाजगीकरण, एकत्रिकरण व दत्तक योजना या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर शाळा संदर्भातला हा निर्णय देखील आम्ही शासनाला मागे घ्यायला भाग पाडू.

*युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की,* गेल्या नऊ वर्षापासून भारतात सरकारी संस्था सरकारी कार्यालय खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने केला असून त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी भरती हा जीआर काढण्यात आला होता. परंतु राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यभरात विविध शहरात आंदोलन घेऊन महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण केला. यामुळे महाराष्ट्र सरकारला त्यांनी घेतलेल्या या तुघलकी निर्णयाला मागे घ्यावा लागला. वाढती महागाई आणि बेरोजगारी या विरोधात तरुणाई मध्ये भाजप सरकार विरोधात प्रचंड रोष असून पिंपरी चिंचवड शहरातील युवक मतपेटीतून भाजपचा विरोध करतील.


यावेळी राष्ट्रवादीचा युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, संदिप चव्हाण, राजेश हरगुडे, स्वप्नाली असोले, अक्षय शेडगे, हर्षद परमार, सूरज देशमाने, नितीन मोरे, अभिषेक कांबळे, राहूल नेवाळे, राहुल पवार ,सागरभाऊ तापकीर विशालभाऊ क्षीरसागर , विक्रम गजभट्टे ,शाहिद शेख ,ओम शिरसागर रजनीकांत गायकवाड मेघराज लोखंडे ,अनिकेत बिरंगल उपस्थित होते.

See also  शहरातील सर्वसामान्य नागरिक काँगेस पक्षासोबत - डॉ.कैलास कदम