बाणेर येथील नाले सफाई व ड्रेनेज लाईनच्या कामाची पाहणी

बाणेर : बाणेर येथील नाले सफाई व ड्रेनेज लाईन लिकेज बाबत मुरकुटे गार्डन येथील नाल्याची पाहणी पुणे महानगरपालिका ड्रेनेज विभागाचे अधिकारी श्री अलबर, JE श्री अनिकेत शिंदे साहेब यांच्या सोबत करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर माजी उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य प्रल्हाद सायकर, भाजपा वॉर्ड अध्यक्ष सुभाष भोळ उपस्थित होते.

या नाल्यामध्ये सतत ड्रेनेजचे पाणी वाहते नाल्यालगत असलेल्या सोसायटी भागामध्ये दुर्गंधी पसरली आहे अशी तक्रार राज्याचे कॅबिनेट मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे नागरिकांनी लेखी स्वरूपात केली होती. या नाल्याबाबत साईट व्हिजिट करून मार्ग काढण्याच्या सूचना केल्या, नाल्यामध्ये ड्रेनेज पाणी येऊ देऊ नये जायका प्रकल्पामध्ये जी लाईन नाला गार्डन मधून केली आहे त्या लाईनला नाल्यातील लिकेज चेंबर करून जोडावे व नाला त्वरित स्वच्छ करावा अशी सूचना देऊन काम सुरु करण्यात आले.

See also  बाणेर येथे सदगुरु महिला मंडळ तर्फे सॅनिटरी पॅड विषयी मार्गदर्शन