कोथरूड : अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्रीरामांच्या आगमनाने देशभरातील नागरीक जल्लोष व्यक्त करत असताना प्रभू श्रीरामांच्या प्रथम दर्शनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील भावूक झाल्याचे पहावयास मिळाले. श्रीरामांच्या दर्शनाने जीवन सार्थक झाल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
अयोध्येतील भव्य मंदिरात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि रा. संघाचे सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाना झाली. हा सोहळा संपूर्ण देशभरातील नागरीकांनी विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिला. कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर मंदिरात ही या निमित्ताने विशेष नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली.
नामदार पाटील यांनी मृत्यूंजयेश्वराचे दर्शन घेऊन प्राणप्रतिष्ठानेचा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून पाहिला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारी वर्ग अनिलजी व्यास(संभाजीनगर संघचालक), देवदेवेश्वर संस्थानाचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मंडल सरचिटणीस गिरीश खत्री, प्रा. अनुराधा एडके, मंजुश्री खर्डेकर, नवनाथ जाधव, प्रभाग क्रमांक १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, अजित जगताप, प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर, बिपिनजी पाटसकर , सुनिलजी जोशी, कुणाल तोंडे,सुयश बुटाला,पार्थ मटकरी स्वप्निल राजवडे,अद्वैत जोशी, सुचित देशपांडे,देवेंद्र जाधव, अथर्व आगाशे,आसिफ तांबोळी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि भागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर रामलल्लांचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. यावेळी दृकश्राव्य माध्यमातून पाहताना नामदार चंद्रकांतदादा पाटील अतिशय भावूक झाले.
या कार्यक्रमानंतर बोलताना ते म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना स्वर्गीय मदनदास देवीजींचे यांचे मार्गदर्शन आणि मोरोपंतजी पिंगळे यांच्या सूचनेनुसार राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. यावेळी माझ्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदीजी आणि हरेंद्रकुमार पांडे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे रामजन्मभूमीशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे.
ते पुढे म्हणाले की, श्री राम मंदिर निर्माण आणि प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रदीर्घ अमावस्येनंतर अनेक दशकांपासून पसरलेल्या गडद अंधकाराचा अंत करणारी पौर्णिमा सुरू झाली आहे, जगभरातील कोटी कोटी हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे.आजचा मंगलदिन हा मा. पंतप्रधान श्री. नरेंद मोदीजी आणि असंख्य राम भक्त, कारसेवक यांचे त्याग, समर्पण आणि बलिदानाचे फलित आहे, असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
या कार्यक्रमानंतर कारसेवक संदीप खर्डेकर, डॉ संदीप बुटाला, मंदिरातील काही श्रमिक बांधव आणि कर्तव्य तत्पर महिला पोलीस अधिकारी तथा दामिनी पथकाच्या कोथरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी दामिनी मार्शल अंमलदार श्रुती कढणे,राखी जाधव,वंदना खूमटकर, स्वप्ना पठाडे, अनुष्का जगदाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतजी पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
घर ताज्या बातम्या रामलल्लाच्या दर्शनाने जीवन सार्थक झाल्याचे नामदार पाटील यांचे भावनिक उद्गार! कोथरुडमधील मृत्यूंजयेश्वर...