जाळपोळीच्या घटनां पाहता गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात ४० दिवसांत निर्णय घेऊ असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. जी परिस्थिती आज ओढावली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. त्यांना खोके घ्यायला वेळ आहे. पण मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यायला वेळ नाही. या सगळ्या जातसमूहांची फसवणूक करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली आहे. त्याला ट्रिपल इंजिन खोके सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्रात आज अस्थिर वातावरण आहे. लोकांना फसवायचे, सत्तेचा गैरवापर करायचा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यामाध्यमातून लोकांना छळणे, हे काम केले जात आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेसाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही.

बीडमध्ये एका आमदाराचे घर काही अज्ञात व्यक्तींनी जाळले. लोकप्रतिनिधींची घरे पेटवून दिली जात आहेत, अशा वेळी राज्याचे गृहमंत्री कुठे आहेत? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. हे गृहमंत्री आणि ट्रिपल इंजिन खोके सरकारचे पूर्णपणे अपयश आहे. गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र जाळपोळ होत असताना गृहमंत्री मात्र प्रचार प्रमुखाची जबाबदारी दुसऱ्या राज्यात पार पडत आहेत. गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

See also  अनाथ मुलांसाठी गृह प्रकल्पांमध्ये प्राधान्य हवे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे