लसीकरणाला गती देण्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन

पुणे : नियमित लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी पुण्यातील हॉटेल कॉनरॅड येथे विविध राज्यातील प्रतिनिधींच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

युएसएआयडी द्वारे संचलित ‘मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी’ प्रकल्पाच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेत विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अशासकीय संस्था, प्रकल्प भागीदार यांनी कोविड लसीकरणाच्या व्यवस्थापनात आलेले अनुभव मांडले. या अनुभवांचा उपयोग नियमित लसीकरण मोहिमेत सातत्य राखण्यासाठी तसेच प्रकल्पाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी होऊ शकतो असे यावेळी सांगण्यात आले.

नियमित लसीकरण कार्यक्रम वाढीसाठी विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एनजीओच्या प्रकल्प भागीदारांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय कार्यशाळेत मांडले. या कार्यशाळेत लसीकरण कार्यक्रमाच्या शिफारसी तयार करण्यावर भर दिला गेला.

देशातील लसीकरणाला गती देण्याच्यादृष्टीने युएसएआयडीद्वारे संचलित मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन आणि इक्विटी प्रकल्प हे देशभरात १८ राज्यात कार्य करीत आहे. या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट कोविड-१९ लसीकरणांची मागणी, वितरण आणि स्वीकृती वाढवणे हा होता.

या कार्यशाळेस जेएसआय इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कपूर, मोमेंटम रुटीन इम्युनायझेशन ट्रान्सफॉर्मेशन अँड इक्विटीचे प्रकल्प संचालक डॉ. गोपाल सोनी, महाराष्ट्र, राजस्थान, नागालँड आणि तामिळनाडू येथील राज्य लसीकरण अधिकारी, उपसंचालक (आरोग्य), जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

See also  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविणे आणखी झाले सोपे; ‘सीएमएमआरएफ’ ॲपवर अर्ज भरून मदत मिळविता येणार