वडगावशेरी : शिवसेना महिला आघाडी वडगावशेरीच्या सौ.नेहा योगेश शिंदे (विभाग प्रमुख) यांच्या वतीने व डॉ.श्रीकांत शिंदे (वैदकीय कक्ष) यांच्या संयुक्त विद्यामानाने. खास थॅलेसेमिया रुग्णांसाठी ब्राइट बिगिनियर्स स्कूल (लोहेगाव) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमोद नाना भानगिरे (शिवसेना पुणे, शहरप्रमुख) यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य रक्तदान शिबिराला सौ.नमिता भार्गव (शाळा संचालक), शिवसेना वडगाव शेरी (उपशहर) मा.प्रमुख सुनील जाधव, प्रभाग प्रमुख येरवडा सुहास कांबळे,शाखा प्रमुख संजोगिता सिंग,अलका अभंगे व शिवसैनिक उपस्थित होते. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.