वैकुंठ परिवाराचा एक पणती पूर्वजांसाठी हा भावस्पर्शी उपक्रम – ना. चंद्रकांतदादा पाटील.

पुणे : वैकुंठ परिवाराच्या वतीने गत 25 वर्षे सुरु असलेला ‘एक पणती पूर्वजांसाठी’ हा उपक्रम अत्यंत भावस्पर्शी असून ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची संधी मिळते असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

सालाबादप्रमाणे वैकुंठ परिवाराच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी वैकुंठ परिवाराचे पिनाक मोघे,संदीप खर्डेकर, राजू गिजरे, रमेश पायगुडे, भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणारे धनंजय विचारे, श्री. पोटे, रंगावलीकार प्रसाद करशेट्टी इ उपस्थित होते.


भटक्या विमुक्तांसाठीचे कार्य हे पुण्यकर्म असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोलाचे असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले.
यावेळी यमगरवाडीतील मुलांसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील, पिनाक मोघे व राजू गिजरे यांच्या हस्ते निधी समर्पण करण्यात आले.यावेळी प्रसाद करशेट्टी यांनी विद्युत दाहिनीच्या हॉल मध्ये काढलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या व अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य रांगोळी चे उपस्थितांनी कौतुक केले व ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, राजू गिजरे यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली, धनंजय विचारे यांनी भटक्या विमुक्तांसाठी सुरु असलेल्या सेवाकार्यांची माहिती दिली, पिनाक मोघे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
यावेळी वैकुंठ परिसर 5000 पणत्यांच्या प्रकाशात उजळून गेले होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाळुंगे बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवन व म्युझियमचे भूमिपूजन