बाणेर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, पर्यावरण प्रेमी नागरिकांची कारवाईची मागणी

बाणेर : बाणेर येथील वीर सावरकर उद्यानाला लगत असलेल्या ब्ल्यू व रेड झोन मधील मोठ्या प्रमाणात वृक्षांची खाजगी विकसकाकडून तोड करण्यात आली. वृक्ष संवर्धन विभागाची परवानगी न घेता ही तोड करण्यात आली असून पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या वतीने याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

रामनदी व मुळा नदी संगमाच्या जवळच असलेल्या या परिसरात मोठ्या प्रमाणात फळांची व देशी प्रजातीची झाडे आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या परिसरामध्ये अवैद्य रीतीने होत असलेली वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे याला पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी नसताना ही वृक्षतोड करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने पंचनामा करून यावर कारवाई करण्यात यावी तसेच पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे.

वृक्ष निरीक्षक अनिल साबळे म्हणाले, सदर वृक्ष तोडीची पाहणी करण्यात आली असून पंचनामे करून या संदर्भात कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हे दाखल करण्यात येतील.

See also  अदानी समूहाचे शरद पवार यांनी केलेले समर्थन निश्चितच पूर्ण अभ्यास करूनच केले असावे – मुख्यमंत्री शिंदे