पुणे : महाराष्ट्रात जेव्हापासून देवेंद्र फडवणीस यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार हातात घेतला आहे, तेव्हापासून राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली आहे. दिवसाढवळ्या खून,बलात्कार, दरोडा पडत आहेत, गृह विभागाचा कुठल्याही प्रकारचा अंकुश राहिला नसून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे, देवेंद्र फडवणीस हे राज्यात फक्त भाजपाचा प्रचार सोडून दुसरे कुठलेही काम करताना दिसत नाहीत. राज्यात पेपरफुटी सारख्या घटना होत आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये ज्याप्रकारे पेपर फुटीच्या सर्रास घटना होत असतात त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा होत आहे, आम आदमी पार्टीने गृहमंत्रालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून, आंदोलने, आक्रोश मोर्चा काढून सुद्धा गृहमंत्र्यांवर याचा कुठलाही परिणाम झालेला नाही. पन्नास खोके घेवून बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी थांबवण्यासाठी पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरले आहेत.
काल उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दिसून येते. फडणवीसांच्या संरक्षणात भाजपचा आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करू शकतो, तर राज्यातील सर्वसामान्य जनता सुरक्षित कशी राहणार? असा प्रश्न आम आदमी पार्टी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विचारत आहे, राज्यातील लोक सध्या खूपच घाबरले असून न्यायासाठी कुणाकडे जावे असाही प्रश्न करीत आहेत.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांनी पोसलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी अकार्यक्षम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हटवावे. कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. भाजप नेते आणि आमदारांची गुंडगिरी थांबवण्यासाठी कारवाई करण्याची हिंमत गृहमंत्र्यांनी दाखवावी.ही मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, राज्य प्रवक्ते मुकुंद कनिष्क जाधव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मीना जावळे शंकर थोरात,निलेश वांजळे, शेखर ढगे ,सतीश यादव ,अक्षय शिंदे, किरण कद्रे, निरंजन अडागळे,अनिश वर्गीस, ॲड.गणेश थरकुडे, समीर आरवाडे, साहिल परदेशी, चंद्रमणी जावळे, मीनाताई कावळे , ऋषिकेश मारणे, मिलिंद सरोदे, झिबिल शेख, सुनील सावंत, राजेश ओव्हाळ , कीर्तीसिंग चौधरी ॲड.गणुजी मोरे,सुरेखा भोसले,शितल कांलडेकर, माधुरी गायकवाड ,किरण कांबळे, उमेश बागडे, जिबरील शेख , सुरज सोनवणे,श्रध्दा शेट्टी, कुमार धोंगडे, मनोज शेट्टी नुराली सयद, राज चाकणे, प्रतीक बनसोडे, आरती करंजावले, ज्ञानेश्वर नाईक, गोकुळ कोलते, पाडळे रवींद्र , प्रिया जाधव, अर्चना वांजळे, पद्मा साळुंखे, स्मिता पवार, यल्लाप्पा वालदोर, संजय मंदिर, फहीम खान, सुनील भोसले, प्रशांत कांबळे, प्रकाश हगवणे, अमोल मोरे, शिवराम ठोंबरे, सचिन कोतवाल, धनराज पांचाळ,असिफ मोमीन, ॲड.प्रदीप माने,अली सय्यद,
घर ताज्या बातम्या राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था बघता, गुहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा...