धनकवडी : बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या “राज्य जिमनास्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत टंबलिंग जिमनॅस्टिक्स प्रकारात
सौख्या शेटे ने सुवर्ण पदक, तर साहिल मरगजे ने सिल्व्हर पदक पटकावले असून सौख्या व साहिल मरगजे दोघांचीही केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय टंबलिंग जिमनॅस्टिक्स स्पर्धे करिता महाराष्ट्र संघा मध्ये निवड झालेली आहे.
साहिल मरगजे मराठवाडा मित्रमंडळ काॅलेज ऑफ काॅमर्स, मध्ये द्वितीय वर्षात शिकत असून गतवर्षी चंदीगड येथे झालेल्या आँल इंडिया नँशनल चँम्पियन स्पर्धेत यशस्वी सहभाग घेतला होता.
तसेच आर्टिस्टिक्स जिमनॅस्टिक्स स्पर्धे मधे हेरंब चव्हाण याने पॉमेल हॉर्सप्रकार मधे कांस्य पदक मिळवले असून आर्टिस्टिक्स गट स्पर्धेमधे वरिष्ठ गटात पुणे संघने मुलांच्या गटा मधे सांघिक कांस्य पदक तर मुलींचे गटामधे सांघिक सुवर्ण पदकप्राप्त केले आहे. तर ट्रैम्पोलीन जिमनॅस्टिक्स स्पर्धे मधे वरिष्ठ गट पुरुष गटामधे पुणे संघाने सांघिक रौप्य पदक मिळवले आहे.
संघातील सर्व खेळाडू बिबवेवाडी येथील एस के जिमनॅस्टिक्स अकॅडमी मधे मागील ५ वर्षापासून जिमनॅस्टिक्स चे प्रशिक्षण राष्ट्रीय प्रशिक्षक सौरभ कोकाटे, सचिन पुणेकर व कोमल धुमाळ यांचे कडून घेत आहेत.
घर ताज्या बातम्या राज्य जिमनॅस्टीक स्पर्धेत एसके च्या जिम्नॅस्टिक्सपटूं ची चमकदार कामगिरी, सौख्या शेटे व...