शिवरकर विद्यालयाचे प्राचार्य लहू वाघुले सर जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

वानवडी, पुणे : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत मुख्याध्यापक , शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गणेश कला क्रीडा मंच येथील समारंभात सन्मानित करण्यात आले.


समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध लेखक व उद्योजक शरद तांदळे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील, पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य समन्वयक शिवाजी खांडेकर, महामंडळाचे सचिव शांताराम पोखरकर उपस्थित होते.


विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे प्राचार्य श्री. लहू वाघुले सर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल हवेली विभागातून गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब शिवरकर ( माजी राज्यमंत्री), सचिव चंद्रकांत ससाणे सर ( संचालक : सन्मित्र सहकारी बँक), माजी नगरसेविका कविताताई शिवरकर, माजी नगरसेवक अभिजित शिवरकर, सन्मित्र बँकेचे चेअरमन सुनिल गायकवाड, संचालक मंडळ, विद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी प्राचार्य लहू वाघुले सर यांचे अभिनंदन केले.

See also  शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्यादृष्टिने स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन व्हावे-पोलीस आयुक्त रितेश कुमार