सुसगाव येथील व्हीबग्युअर स्कूल ते सनी वर्ल्ड रस्त्यावरील बंद पथदिवे सुरू करण्यात यावेत

सुसगाव : सुसगाव येथील व्हीबग्युअर स्कूल ते सनी वर्ल्ड रस्त्यांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पथदिवे बसवण्यात आले असून या खांबांवरील पथदिवे बंद असल्याने या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

सुस महाळुंगे गावाच्या हद्दीवरील रस्ता अंधारात असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सुसगाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने या परिसरामध्ये तातडीने पथदिवे बसवले होते. परंतु पथदिवे वारंवार बंद असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

सुसगाव परिसरातील पुणे महानगरपालिकेने बसवलेले पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  आंब्याचे मार्केटिंग करताना क्यूआर कोडचा वापर करावा – पालकमंत्री दीपक केसरकर