बार्टी यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्रात १८ तास अभ्यास अभियाना द्वारे महामानवांना अभिवादन.

पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत येरवडा येथे निवासी यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्र सुरु आहे. क्रांतीज्योती महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बार्टी मार्फत *”समता सप्ताह २०२४”* अंतर्गत  बार्टी संस्थेचे मा. महासंचालक सुनिल वारे व विस्तार व सेवा  आयबीपीएस विभाग प्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत.

दिनांक १७ एप्रिल २०२४ रोजी बार्टी यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्र येरवडा संकुल बार्टी येथे १८ तास अभ्यास अभियानद्वारे महामानवांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ६ ते रात्री १२ वाजे पर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यास करून अभिवादन करणे हा नावीन्य पूर्ण उपक्रमाची सुरुवात बार्टी संस्थेमध्ये करण्यात आली. सकाळी सहा वाजता यु.पी.एस.सी प्रशिक्षण केंद्राचे सहाय्य्क प्रकल्प व्यवस्थापक श्री. विकास गायकवाड यांनी *आनापान व मंगल  मैत्री* सत्राची सुरुवात केली. यावेळी श्री. विकास गायकवाड प्रकल्प व्यवस्थापक डॉ प्रेम हनवते ग्रंथपाल श्री. विनायक भालेराव वसतिगृह अधीक्षक श्री. रणजित पात्रे, श्री रामदास लोखंडे,प्रशिक्षणार्थी  सोनाली गायकवाड, श्री. योगेश वायदंडे  यांच्या हस्ते महात्मा  ज्योतिराव फुले  आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सर्व प्रशिक्षणार्थींनी अभिवादन केले व १८ तास अभ्यास अभियानाची सुरुवात करण्यात आली.

See also  पुणे महानगरपालिकेत महापौर आम आदमी पार्टीचा - सुदर्शन जगदाळे शहर अध्यक्ष यांचा  संकल्प, आम आदमी पार्टी आघाडी विस्तार व पदग्रहण सोहळा