मुंबई, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली होती. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांकरिता आज १२ जुलै २०२४ रोजी मतदान व मतमोजणी करण्यात आली.
या निवडणुकीत श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, योगेश कुंडलिक टिळेकर, डॉ.परिणय रमेश फुके, अमित गणपत गोरखे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, कृपाल हिराबाई बालाजी तुमाने, भावना पुंडलिकराव गवळी, शिवाजीराव यशवंत गर्जे, राजेश उत्तमराव विटेकर, सदाभाऊ रामचंद्र खोत आणि मिलिंद केशव नार्वेकर हे ११ सदस्य विजयी झाले आहेत, अशी घोषणा विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.जितेंद्र भोळे यांनी केली.
विधानपरिषद सदस्य डॉ. मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब,रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ. वजाहत मिर्झा अथेर मिर्झा, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे 27 जुलै 2024 रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडून ही निवडणूक घेण्यात आली होती.