बाणेर मध्ये 45 हजार स्क्वेअर फुट अतिक्रमण कारवाई करून हटवले

बाणेर : बाणेर येथे मुख्य रस्त्यावरील अनाधिकृत साईड मार्जिन मधील बांधकामांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली सुमारे 45 हजार स्क्वेअर फुट अतिक्रमण हटवण्यात आले.

बाणेर येथील हाँटेल फिलामेंट,  हाँटेल एलिफंट, हाँटेल चैतन्य पराठा व बाणेर मुख्य रस्ता गणराज चौक ते हाँटेल ग्रीनपार्क चौकापर्यंत,  तसेच शाँप समोरील फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन यावर बांधकाम विकास विभाग झोन क्र.3 औंध क्षेत्रीय कार्यालय कडील अतिक्रमण निरिक्षक, घरपाडी चे कामगार व  पोलीस स्टाफच्या मदतीने  कारवाई  करण्यात आली.

सदर कारवाईमधे  सुमारे 45000 चौ.फूट  क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे.

See also  पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते "पुणे डेंटल शो"चे उद्घाटन