दहीहंडी गोविंदा पथक व गणपती बाप्पा मुर्ती वाहतूक करणाऱ्या वाहनांना महाराष्ट्रतील सर्व टोलनाक्यांवर टोल माफीची निलेश निम्हण यांची मागणी

मुंबई  : भाजपा ट्रान्सपोर्ट सेल व नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री  एकनाथ शिंदे  यांना महाराष्ट्रातील प्रमुख सण दहीहंडी गोविंदा पथक व गणपती बाप्पा मुर्ती वाहतूक करणाऱ्या वाहनांना महाराष्ट्रतील सर्व टोलनाक्यांवर टोल माफ करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री निलेश निम्हण यांनी निवेदन दिले.

गणपती उत्सवात गणपती बाप्पा मुर्ती वाहतूक करणाऱ्या वाहनांना  तसेच दहिहंडी उत्सवात गोविंदा पथकांना वाहतूक करताना टोल नाक्यांवर टोल आकारणी करण्यात येऊ नये जेणे करून गणपती बाप्पा मुर्ती स्वस्त दरात उपलब्ध होतील. तसेच गोविंदा पथकांना देखील प्रोत्साहन मिळेल अशी मागणी निलेश निम्हण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

See also  महाळुंगे बालेवाडी "श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे" गुगल मॅप वर "छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॅाम्प्लेक्स" अमोल बालवडकर यांची कारवाई करण्याची मागणी