येरवडा कारागृहात अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक संपन्न

पुणे, दि २: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली येरवडा मध्यवर्ती कारागृहातील विविध विषयांबाबत अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक कारागृहात आयोजित करण्यात आली.

यावेळी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, पुणे शहर तहसीलदार सुर्यकांत येवले, येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, विभागीय आयुक्त कार्यालयाचे राकेश जमादार तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत डॉ. दिवसे यांनी कारागृहातील सोई-सुविधा, कारागृह सुरक्षा व्यवस्था, नवीन बांधकामे, कारागृहाच्या जागेवरील अतिक्रमण, बंदी आरोग्य कारागृहाच्या दैनंदिन अडी-अडचणी बाबत माहिती जाणून घेतली. कारागृहाशी संबंधित प्रलंबित विषय, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी मार्गी लावण्याबाबत संबंधित विभागांना डॉ. दिवसे यांनी निर्देश दिले.

डॉ. दिवसे यांच्या हस्ते जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आलेल्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या टँकर व बोलेरो वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

See also  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे पालकमंत्र्यांच्या कडून अभिनंदन