पिरंगुट : पिरंगुट येथे अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाने गाडीचा तपास करून देखील पोलीस यंत्रणा कारवाई करत असल्याने नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांचा पाठिराखा आहे का असावा यंत्रणेला विचारला आहे.
पिरंगुट येथेनमस्कार समीर सोपान मराठे राहणार पिरंगुट तालुका मुळशी जिल्हा पुणे दिनांक 4/8/2024 रोजी पत्नीसह रात्री मेडिकल मधून घरी जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीने जोरदार धडक देऊन पळून गेला. मराठे यांना डोक्याला गंभीर जखम झाल्याने बेशुद्ध अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर वारंवार पोलिसांशी संपर्क साधण्यानंतर देखील अपेक्षित कारवाई झाली नाही.
सादर इसम हा पिरंगुट मधील असून 11 दिवस झाले परंतु सदर इसमा वर पोलीस यंत्रणा कारवाई नाही करत आणि त्याला पाठीशी घालून आम्हाला न्याय मिळून देत नाही असे मराठे यांनी सांगितले.
अपघातातील चार चाकी गाडी पिरंगुट मधील गाडी असून MH12..9596 गाडीचा नंबर असून सदर गाडी चे फुटेज मराठे यांनी स्वतः कढून घेतले. तसेच पोलिसांना देखील दाखवले. परंतु पोलीस योग्य तपास करून कारवाई करत नसल्याने गुन्हा करणाऱ्यांना चालना देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पिरंगुट येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी तसेच अपघाताच्या गुन्ह्यातील गाडी तातड्याने ताब्यात घ्यावी अशी मागणी समीर मराठे यांनी केली आहे.