संदीप धारू बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन

बालेवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार बाणेर-बालेवाडी -पाषाण-सुतारवाडी -सुस-म्हाळुंगे प्रभाग क्रमांक -९  इथे राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष श्री.संदीप धारूजी बालवडकर व युवती अध्यक्ष सौ.सुषमा संदीप बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन  खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.श्री.प्रशांतदादा जगताप शहराध्यक्ष, पुणे शहर ,महिला शहर अध्यक्षा सौ. स्वातीताई पोकळे व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बालेवाडी परिसरामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भव्य जेसीबीच्या द्वारे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी बालवडकर यांच्या कार्यालयाची माहिती घेतली.

See also  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश