गणेश भक्तांच्या मदतीला माय माऊली धावली

पुणे : पुण्यातील सर्वात मोठा उत्सव व सर्वात ज्यास्त लोक एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे गणेश विसर्जन मिरवणुकीचे या ठिकाणी काही आपत्कालीन परिस्थिती ओढवली जाऊ शकते याच कारणाने पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास यांना प्रतिसाद देत, कात्रज येथील स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित माय माऊली केअर सेंटर ची ॲम्बुलन्स गणेश भक्तांच्या सेवेसाठी उत्सव काळासाठी देण्यात आली.

बेलबाग चौकात पोलीस आयुक्त पुणे शहर मा रितेश कुमार साहेब पोलीस उपायुक्त पुणे शहर मा.अरविंद चावरीया साहेब* यांनी उदघाटन करून विघ्नहर्ता न्यास यांना हस्तांतरण करण्यात आले, याप्रसंगी *विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ. मिलिंद भोई, विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच विघ्नहर्ता न्यासचे सदस्य व भोई प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
याप्रसंगी माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष श्री.विठ्ठलराव वरुडे पाटील यांनी सांगितले की या माध्यमातून आम्हाला गणेश भक्ताची सेवा उपलब्ध करून दिली या बद्दल आमचे मार्गदर्शक पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त डॉ मिलिंद भोई यांचे आभार मानले. तसेच यापुढे देखील पुणेकरांच्या सेवेसाठी माय माऊली केअर सेंटर कायमच उपलब्ध असणार आहे.

See also  नवजात बालकांसाठी दळवी रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची मागणी - आ.सिद्धार्थ शिरोळे