पाषाण-सुतारवाडीतील प्रलंबित रस्त्यांचा कामांसाठी पथ विभाग प्रमुखांची भेट

पाषाण : पुणे शहर भाजपा उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी पुणे मनपा पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पासकर यांची भेट घेऊन परिसरातील रखडलेल्या रस्त्यांची कामे त्वरित सुरु करण्याची विनंती केली.

यात सुतारवाडी येथील PMT डेपो ते सुस रोड याना जोडणारा २४ मी. डीपी रोड भुसंपादना अभावी रखडला आहे,त्यामुळे हायवे/सुतारवाडी कडे जाण्यास नागरिकाना गैर सोय होत आहे.PMT डेपो कार्यान्वित होण्यास विलंभ होत आहे,शिवाय 27×7 सामान पाणीपुरवठा लाईन चे काम रखडले आहे.त्यामुळे या रस्त्याचे भूसंपादन करुन त्वरित रस्ता सुरु करण्याची विनंती केली.

पुणे मनपा पथ विभाग प्रमुख श्री अनिरुद्ध पावसकर यांनी हा प्रस्ताव त्वरित स्थायी समितीत मंजुर करुन घेऊ व मुळ मालकांना मोबदला देऊन रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करण्यात येईल असे सांगितले.
बाणेर-पाषाण लिंक रोडचे मॅग्नोलिया सोसायटी ते स्टार बाजार दरम्यानचे रखडलेले काम त्वरित चालु करण्यात येईल.तर मुख्य सुस रोड वर आवश्यक तेथील स्पीड ब्रेकर त्वरित बसवण्यात येतील व बेदरकार वाहन चालकांचा वेगाला त्वरित नियंत्रित करण्यात येईल असेही श्री पावसकर यांनी सांगितले

See also  परिहार चौकातील गाळेधारकांचे आंदोलन