शासकीय तंत्रनिकेतने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात सामंजस्य करार

मुंबई :  केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स  अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतने,अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
नवी दिल्ली, रेल भवन येथे आज रेल्वे, सूचना व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.


यावेळी तंत्र शिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळचे संचालक, डॉ. प्रमोद नाईक,  केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डॉ. मदन मोहन त्रिपाठी, महासंचालक, एन आय इ एल आय टी (NIELIT), श्री. अभिषेक सिंग, मान्यवर उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव  म्हणाले, महाराष्ट्र  राज्याला औद्योगिक वारसा लाभलेला आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने  हा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे. महाराष्ट्रात  यशस्वीरीत्या अंमलबजावणी करुन पुढे देशभरात हा उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमाचा शासकीय तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकरीता सेंटर ऑफ एक्सलन्स ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश असून या सेंटर मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाही सुसंगत असल्याचे सांगितले.
ईया सामंजस्य कराराच्या अंतर्गत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज इंडस्ट्री ४.०, 3 डी प्रिंटिंग अँड अलाईड टेक्नॉलॉजी फॉर कपॅसिटी ट्रेनिंग अँड आर अँड डी सेंटर्स  (Artificial Intelligence (AI), Robotics, Internet of Things (IoT), Industry 4.0, 3D Printing and Allied Technologies for capacity training and R&D centers) या क्षेत्रांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्यातील शासकीय तंत्रनिकेतने व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तंत्र शिक्षणाचे बळकटीकरण, ज्ञानाची प्रगती आणि नवकल्पनांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येतील. या उपक्रमासाठी लागणारे आर्थिक सहाय्य भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान व इतर शासकीय प्राधिकरणे यांच्याकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण प्राप्त होऊन उद्योगसमुहांना तांत्रिक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल व रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील, याकरीता डॉ. विनोद मोहितकर, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य व डॉ. प्रमोद नाईक, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे आभार व्यक्त केले.

See also  मागील दोन वर्षापासून सरकारी शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळत नसल्याने महापालिकेत आप चे आंदोलन