कोथरूड : वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा मतदारसंघ इच्छुक उमेदवारीसाठी बाणेर येथील पक्षाचे सतीश सावळाराम रणवरे यांनी शहराध्यक्ष एडवोकेट अरविंद तायडे यांच्याकडे उमेदवारी मिळण्यासाठी मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक म्हणून सतीश सावळाराम रणवरे कार्यरत आहेत. कोथरूड मधील वंचित घटकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाने मला द्यावी अशी मागणी यावेळी सतीश रणवरे यांनी केली आहे. बाणेर गावचे माजी सरपंच जंगल रणवरे यांचे ते पुतणे आहेत.