प्रभाग क्रमांक ९ सुस–बाणेर–पाषाण : महिला सर्वसाधारण जागेसाठी पार्वती निम्हण यांचे नाव चर्चेत

पाषाण : प्रभाग क्रमांक ९ सुस–बाणेर–पाषाण येथील महिला सर्वसाधारण जागेसाठी पार्वती अजय निम्हण या एमबीए शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित युवतीचे नाव अचानक पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या ‘धक्का तंत्रा’मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अवघ्या २३ वर्षांच्या, सामाजिक कार्याची जाणीव असलेल्या तरुणीचा नागरिकांसमोर राजकीय उमेदवार म्हणून नवा पर्याय उभा राहिल्याचे चित्र आहे.

यानिमित्ताने पाषाण परिसरातील निम्हण विरुद्ध कोकाटे ही पारंपारिक लढत पुन्हा एकदा राजकीय पटलावर रंगण्याची शक्यता निर्माण झाली असून पार्वती निम्हण सध्या लक्षवेधी ठरत आहेत. शिक्षण, तरुणाई आणि सामाजिक जाणिवांचा संगम असलेली उमेदवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अजय निम्हण हे पाषाण परिसरात गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील विश्वासार्हता ही पार्वती निम्हण यांच्यासाठी महत्त्वपूर्ण जमेची बाजू मानली जात आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये ही उमेदवारी नेमका कोणता राजकीय रंग दाखवते, याकडे नागरिकांसह राजकीय पक्षांचेही लक्ष लागले आहे.

See also  एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धेचे १४ आणि १५ डिसेंबर रोजी आयोजन