सर्वसामान्य जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढणार -अमोल बालवडकर   मंगळवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

बालेवाडी : जनतेच्या विरोधात जाऊन उमेदवार दिला तर जनता काय करते हे दाखवणारी ऐतिहासिक निवडणूक होईल. अपक्ष लढून जनतेला न्याय देणार ही स्वाभिमानाची लढाई आहे असे अमोल बालवडकर यांनी सांगितले.

बालेवाडीत येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये अमोल बालवडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निर्णय जाहीर केला यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याचा आग्रह धरला होता.

सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी असून जनतेमधून येत असलेला प्रतिसाद व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी बोलणारा व काम करणारा माणूस म्हणून निवडणूक लढवणार आहे. कोथरूड मतदार संघाची सेवा करण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले.
मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत जोरदार बांधणी करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

See also  आकड्यांच्या पलिकडचा एक्झिट ट्रेंड काय?