कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गांवठाण हजेरी कोठी अंतर्गत “रांगोळीतून साकारले मतदान जनजागृती अभियान”. सदर अभियान प्रभाग क्रं. १०, ११, १२ मधील सर्व आरोग्य मंदिरात राबवण्यात आला.
कोथरूड भागातील मोठ्या सोसायट्या तसेच मुख्य रस्त्यावरील चौका चौकात ” जना मनाची पुकार आहे मतदान आमचा अधिकार आहे. आपल्या मताचे दान आहे लोकशाहीचे शान, आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार, भ्रष्टाचार मुळापासून घालवू या योग्य उमेदवार निवडून द्या, मतदान करा हे दाखवून द्या तुम्ही कर्तव्यदक्षक नागरिक आहात,आपका वोट ही आपकी आवाज है, मी मतदान करणारच आणि माझी लोकशाही सक्षम बनवणारच,चला राष्ट्र विकासाची कास धरू मतदार यादीत नाव समाविष्ट करू, तुमचे मत तुमचा अधिकार,तुमचे एक मत ठरवेल देशाचे बहुमत,मतदान राजा जागा हो संसदीय लोकशाहीचा धागा हो उज्वल भारत देशासाठी सदैव तत्पर रहा हो,तुमचं अमूल्य मत तुमचा विकास घडवेल लोकशाहीला बळकट करेल”. अशा प्रकारच्या रांगोळीतून घोष वाक्याने रस्त्यावरील चौक सजवण्यात आले. तसेच सदर रांगोळीच्या माध्यमातून केलेली जनजागृती कार्यक्रम पाहून रस्त्यावरील नागरिक कुतूहलाने पहात होती व काढलेल्या रांगोळीचे घोषवाक्य वाचून महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत होते.
या उपक्रमातून उपस्थित असलेल्या नागरिकांनी आम्ही १००% मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर उपक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, परिमंडल कार्यालय क्रं. २ चे उपायुक्त अविनाश सकपाळ व महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नायकल यांच्या मार्गदर्शाना खाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवाय आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, गणेश साठे, प्रमोद चव्हाण, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश चोंधे, रूपाली शेडगे, जया सांगडे, संतोष ताटकर, हनुमंत चाकणकर, मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, संजय कांबळे, लक्ष्मण सोनवणे, विजय पाटील, गजानन कांबळे, परेश कुचेकर, शिवाय प्रशिक्षणार्थी आरोग्य निरिक्षक समिर पठाण, साईराज दुबळे, रोहन जाधव यांच्या परिश्रमाने राबवण्यात आले. तसेत विजय नायकल यांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही प्रभागातील २०० नागरिकांनी मतदानाची शपथ घेतली.