सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आम आदमी पक्षाची मागणी

पुणे:  बीड येथील मास्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला असला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात  अत्यंत अमानवी हत्या करण्यात आली आहे. यास गृहखाते जबाबदार आहे त्यामुळे या खात्याचा कारभार सांभाळणारे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे शहर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून राज्यासह देशभरात सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे पडसाद उमटत आहेत त्यामुळे सर्व समाजात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.असे सांगून आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाहीत.संतोष देशमुख यांना अमानुषपणे लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करताना आनंदोत्सव साजरा करतानाचे छायाचित्र व्हिडिओ काढून ते व्हायरल करून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोरांना व त्यांच्या सुत्रधारांना तसेच मदत करणाऱ्यांना तत्काळ फाशी देण्यात यावी.

See also  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन