शासकीय रुग्णालयात सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स तयार कराव्या – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : सरकारी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स निर्माण कराव्या, तसेच त्यांची भरती आऊटसोर्सिंग मार्फतही करण्याचा विचार करून, त्याबाबतही धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत अंदाजपत्रकावरील पुरवणी मागण्यांवरील  चर्चेत बोलताना केली.

सरकारी रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये सुसज्ज पद्धतीने उभी केली जातात. तपासण्या, प्रयोगशाळा यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविली जाते. मात्र, त्याच पद्धतीने ही रुग्णालये चालविण्यासाठी सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सची आवश्यकता आहे. अशा पोस्ट्स सार्वजनिक आरोग्य विभागाकडे भरल्या जात नाहीत, वैद्यकीय अधिकारीच रुग्णालये चालवतात. वास्तविक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या पोस्ट्स निर्माण करायला हव्यात आणि त्या तातडीने भरल्याही जायला हव्यात तरच उत्कृष्ट दर्जाची सार्वजनिक आरोग्य सेवा महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत पुरविली जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चर्चेत बोलताना सांगितले.

सरकारी रुग्णालयांत सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा मिळावी, याकरिता आऊटसोर्सिंग करावे लागले, तरी त्याही पर्यायाचा विचार व्हावा. सरकारने सुसज्ज पद्धतीने उभ्या केलेल्या हॉस्पिटल्समध्ये सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा मिळावी, असा उद्देश आहे. याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाने धोरण ठरवावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

See also  विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मध्ये  ५३ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची उत्साहात सुरुवात