औंध मस्जिद ट्रस्ट येथे काळ्या फिती लावून मुसलमान बांधवांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

औंध : औंध मस्जिद ट्रस्ट येथे नमाज पठणा मध्ये जम्मू कश्मीर पहेलगाम येथे आतंकवादी हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या भारतीय नागरिकांना उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी औंध मधील मुस्लिम बांधवांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. देशावरील हल्ला कोणीही सहन करणार नाही अशा प्रसंगी देश एकजूट असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी औंध मजीत ट्रस्टचे अल्लाउद्दीन पठाण, फैयास खान, हमीद सय्यद मैनुदिदन शेख, इस्माईल शेख, इरफान शेख, असलम शेख आदी उपस्थित होते.

See also  माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या हस्ते कोथरूड मधील विविध मंडळांची गणेश आरती