कोथरूडमध्ये भीम जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना; पहलगाम हल्ल्यामधील मृतांना श्रद्धांजली

पुणे :  कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त ऐतिहासिक महाबुद्धवंदना हा सामूहिक कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड येथे घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जन सामान्यात पोहचावे, आणि आंबेडकरी चळवळ सशक्त करने, या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवने हा उद्देश होता. यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व गौतम बुद्ध याना समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देउन मानवंदना देण्यात आली. पहलगाम येथिल अतिरेकी हल्लयातील  मृत देशबांधवाना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवर आणि हजारो समाजबांधव आणि नागरीक यांच्या साक्षींने महाबुद्ध वंदना पार पडली.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख श्री गजानन थरकुडे, भाजपा नेते श्री शामराव देशपांडे, भारतीय दलित कोब्राचे प्रमुख एडवोकेट भाई विवेक चव्हाण, बिग बॉस फेम  फिल्म अभिनेते अभिजीत बिचुकले, पतीत पाहून संघटना शहर प्रमुख श्रीकांत शिळमकर, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष एडवोकेट अरविंद तायडे, संदीप मोकाटे, आनंद तांबे , जयदीप पडवळ उमेश भेलके , योगेश राजापूरकर गिरीश भेलके ,दुष्यंत मोहोळ ,गणेश वरपे ,नवनाथ जाधव, मारुती वरवे, अनिरुद्ध खांडेकर, संतोष लांडे, विशाल  भेलके,  अमोल डांगे,  नंदकुमार गोसावी, अर्चना चंदनशिवे ,नितीन शिंदे ,अजय भालशंकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी  उत्कृष्ट सामाजिक योगदानाबद्दल गायक साजन बेंद्रे आणी गोरक्ष लोखंडे याना समाजभूषण तर  समाजरत्न पुरस्कार श्री जनार्दन साळवे, रमेश पाटोळे, वैजनाथ गायकवाड, बाबासाहेब जाधव, छाया भोसले, किशोर दळवी, दशरथ खांकाळ, निवृत्ती वाघमारे आदींचा सम्मान करण्यात आला.  सर्वोत्कृष्ट बुद्धविहार पुरस्कारामध्ये सारनाथ बुद्धविहार कोथरूड, भीमरत्न बुद्ध विहार बालेवाडी, सम्यक बुद्ध विहार श्रीकृष्णनगर यांना पूरस्कार देण्यात आले.
जयंतीच्या निमित्ताने राज्याची लाडकी जोडी साजन- विशाल यांचा  लाईव्ह कन्सार्ट घेण्यात आला – बुद्धम शरणम् गच्छामी, शरण बुद्धास.. शरण धम्मास.. शरण संघास.. मी भीमराया! या भीमगीताने सुरुवात झाली. साजन विशाल यांच्या भीम गीतांनी माहोल दणाणून सोडला. परिसरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे आयोजन भीम महोत्सव समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते.,

See also  औंध येथील  शिवदत्त मिनी मार्केटचे बेकायदेशीर पुनर्वसन ताबडतोब थांबवण्याची मागणी


जयंतीच्या निमित्ताने राज्याची लाडकी जोडी साजन- विशाल यांचा  लाईव्ह कन्सार्ट घेण्यात आला – बुद्धम शरणम् गच्छामी, शरण बुद्धास.. शरण धम्मास.. शरण संघास.. मी भीमराया! या भीमगीताने सुरुवात झाली. साजन विशाल यांच्या भीम गीतांनी माहोल दणाणून सोडला. परिसरातील भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे आयोजन भीम महोत्सव समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात आले होते.