Doctor’s Day निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने कळसगाव मध्ये डॉक्टरांचा सन्मान

कळस : Doctor’s Day निमित्त, कळस भागातील कै. गेनबा तुकाराम म्हस्के सरकारी रुग्णालयात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेकडून मंजूर झालेल्या ₹50 लाख निधीच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या प्रसूतीगृहाच्या निमित्ताने येथील डॉक्टरांचा तसेच कळस भागातील सर्व डॉक्टर बांधवांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम “आप पुणे शहर महिला आघाडीच्या पूनम अमित म्हस्के” व “आप पुणे शहराध्यक्ष युवा आघाडी अमित उद्धव म्हस्के” यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात उपस्थित डॉक्टरांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या भागात सुरू होणाऱ्या प्रसूतीगृहामुळे महिलांना मोठा दिलासा मिळेल. ही खरोखरच लोकहिताची बाब आहे.” तसेच डॉक्टरांनी “कळस गावासाठी आम आदमी पार्टीकडून केले जात असलेले कार्य उल्लेखनीय आहे,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमाला आम आदमी पक्षाचे पुणे शहर सह-संघटन मंत्री मा. मनोज शेट्टी, महिला उपाध्यक्ष श्रद्धाताई शेट्टी, रिक्षा संघटनेचे अनिलजी धुमाळ, जोगिंदर पाल सिंग, प्रताप म्हस्के, अरुण शेट्टी, वैभव सकट, यश म्हस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.
Doctors’ Day च्या निमित्ताने “आम आदमी पार्टी पुणे” यांच्यावतीने हा सन्मान सोहळा कळसगाव आणि विश्रांतवाडी भागात साजरा करण्यात आला.

See also  'क्लिन सायन्स' आणि 'निरंजन' तर्फे १५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान