खारावडे( तालुका  मुळशी) येथे “ मैत्र जीवांचे “ या संस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धर्मादाय निधी प्रदान

मुळशी : खारावडे( तालुका  मुळशी) येथे “ मैत्र जीवांचे “ या संस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा धर्मादाय निधी प्रदान सोहळा पार पडला. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या हस्ते पन्नास हजार रूपयांचा धनादेश यावेळी प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा धनादेश संस्थेच्या अध्यक्षा मधुरा भेलके , संस्थेचे पदाधिकारी व माजी सभापती महादेवअण्णा कोंढरे, माजी सरपंच शंकरराव मारणे यांनी स्विकारला.

यावेळी प्रास्तवीक मधुराताई भेलके यांनी केले. महादेवअण्णा कोंढरे व सुनीलभाऊ चांदेरे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुशभाऊ उभे , पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक चंद्रकांत भिंगारे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत मारणे , वसुली अधिकारी राजेंद्र मारणे , सरपंच लक्ष्मण मारणे, चेअरमन सिताराम कांबळे, सरपंच प्रमोद मरगळे , माजी चेअरमन सौ. वृंदाताई येनपुरे ,दिनेश जोगावडे , डॅा. माने मॅडम , सचिव आनंद कुडले , नंदू मारणे, महेश कुडले , अशोक चवले, लक्ष्मण शिंदे , बाळासाहेब काळभोर,विश्वस्त संभाजी गावडे यांनी आभार मानले.

See also  पुणे शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा